मुझफ्फरपूर- जिल्ह्यात आतापर्यंत ४३ लहान मुलांचा मेंदूच्या रोगामुळे (अॅक्युट इन्सेफॅलीटीस सिन्ड्रोम) मृत्यू झाला आहे. तर, ८ जणांची तब्येत सध्या अत्यंत खराब असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी अलोक रंजन घोष यांनी दिली.
धक्कादायक..! मुझफ्फरपूर येथे मेंदूच्या संसर्गजन्य रोगामुळे ४३ मुलांचा मृत्यू - धक्कादायक
इन्सेफॅलिटीस हा संसर्गजन्य रोग असून यामध्ये विषाणू रुग्णाच्या डोक्यावर हल्ला करतात. यामुळे, ताप आणि डोकेदुखीची प्राथमिक लक्षणे दिसून येतात. हळूहळू याची तीव्रता वाढून रुग्णाचा मृत्यू होतो.
जिल्हाधिकारी अलोक रंजन घोष
एसकेएमसीएचचे सुनील शाही यांनी माहिती देताना सांगितले की, यावर्षी आतापर्यंत जवळपास अॅक्युट इन्सेफॅलीटीस सिन्ड्रोमचे १०९ रुग्ण आढळले आहेत. इन्सेफॅलिटीस हा संसर्गजन्य रोग असून यामध्ये विषाणू रुग्णाच्या डोक्यावर हल्ला करतात. यामुळे, ताप आणि डोकेदुखीची प्राथमिक लक्षणे दिसून येतात. हळूहळू याची तीव्रता वाढून रुग्णाचा मृत्यू होतो.