जयपूर - इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आज ५३ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले. यामध्ये ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. इराणमधील तेहरान आणि शिराझ या शहरांमधील हे विद्यार्थी होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
इराणमधील भारतीयांचे चौथे पथक मायदेशी दाखल, ५३ नागरिकांचा समावेश - इराण भारतीय
राजस्थानमधील जैसलमेर येथे या नागरिकांना उतरवण्यात आले. विमानतळावर सर्वांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना जैसलमेरमधील लष्करी तळावर नेण्यात आले. त्यांना याठिकाणी विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल.
इराणमधील भारतीयांचे चौथे पथक मायदेशी दाखल, ५३ नागरिकांचा समावेश..
राजस्थानमधील जैसलमेर येथे या नागरिकांना उतरवण्यात आले. विमानतळावर सर्वांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना जैसलमेरमधील लष्करी तळावर नेण्यात आले. त्यांना याठिकाणी विशेष कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल. आतापर्यंत इराणमधील एकूण ३८९ भारतीयांना परत आणण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे.
हेही वाचा :कोरोनाचा कहर.. कर्नाटकात सातवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित
Last Updated : Mar 16, 2020, 11:04 AM IST