श्रीनगर -जम्मू-काश्मीर राज्याची स्वायतत्ता मागील वर्षी ५ ऑगस्टला काढून घेण्यात आल्यानंतर अनेक राजकीय नेते नजरकैदेत आहेत. त्यातील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या ३ नेत्यांची आज (रविवार) सुटका करण्यात आली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांना श्रीनगरमधील एमएलए वसतीगृहात ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षातील एका नेत्याचीही सुटका करण्यात आली.
अब्दुल माजीद लारमाई, गुलाम नबी भट, डॉ. मोहद सफी आणि मोहम्मद युसुफ भट अशी सुटका करण्यात आलेल्या नेत्यांची नावे आहेत. काश्मीरातील सुरक्षा व्यवस्था बिघडू नये म्हणून त्याना ताब्यात घेण्यात आले होते. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना अजूनही नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.