नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात बुधवारी मोठा अपघात होता होता टळला आहे. कानपूर रेल्वे स्थानकामध्ये गाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कानपूर स्थानकामध्ये गाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले, जीवितहानी नाही
उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात बुधवारी मोठा अपघात होता होता टळला आहे.
कानपूर स्थानकामध्ये गाडीचे चार डब्बे रुळावरून घसरले
कानपूर- लखनौ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक-3 वर येत होती. यावेळी रेल्वे ट्रॅक बदलताना अपघात झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. गाडीमध्ये लखनौवरून कानपूरला येणारे प्रवासी होते.
घटनास्थळी रेल्वे टेक्निकल स्टाफची टीम पोहोचली असून रेल्वेला पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. गाडीची गती धिमी असल्यामुळे हा अपघात टळल्याची माहिती आहे.