नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेतून निवृत्त होऊन तब्बल ४० वर्ष झाली. परंतु, देशसेवा करण्याची मनातील इच्छा कायम होती. या इच्छेमुळेच ७४ वर्षीय निवृत्त सीबीआर प्रसाद यांनी आयुष्यभराची कमाई संरक्षण दलाला मदत म्हणून दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्रसाद यांनी १ कोटी ८ लाख रुपयांचा चेक संरक्षण दलाकडे सुपूर्द केला.
कौतुकास्पद..! भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर ४० वर्षांनी १ कोटी रुपयांची केली मदत - मदतनिधी
भारतीय वायुसेनेला आपण मदत केली पाहिजे, असा निश्चय केला. त्यामुळे, मी संरक्षण दलाला १ कोटी ८ लाख रुपये मदतनिधी म्हणून दिले. राजनाथ सिंह यांना चेक दिल्यानंतर त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला, असेही प्रसाद म्हणाले.
सीबीआर प्रसाद म्हणाले, जवळपास ९ वर्ष भारतीय वायुसेनेत काम केले. यानंतर, मला भारतीय रेल्वेकडून चांगल्या नोकरीची ऑफर आली. त्यामुळे मी वायुसेनेची नोकरी सोडली. परंतु, रेल्वेची नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे मी पोल्ट्रीफार्मचा छोटा व्यवसाय चालू केला. यात मला चांगले पैसे मिळाले. यातून परिवाराच्या सर्व गरजा पूर्ण झाला. परंतु, भारतीय वायुसेनेमुळेच हे सर्व शक्य झाले होते. यामुळे, भारतीय वायुसेनेला आपण मदत केली पाहिजे, असा निश्चय केला. त्यामुळे, मी संरक्षण दलाला १ कोटी ८ लाख रुपये मदतनिधी म्हणून दिले. राजनाथ सिंह यांना चेक दिल्यानंतर त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.
प्रसाद २० वर्षाचे असताना भारतीय वायुसेनेत नोकरीला लागले होते. घरातून ५ रुपये घेऊन बाहेर पडलेल्या प्रसाद यांनी मेहनतीच्या जोरावर ५०० एकर जमीन खरेदी केली. परंतु, यातील फक्त ५ एकर पत्नीला आणि १० एकर जमीन मुलीच्या नावावर केल्यानंतर बाकी सर्व जमीन सामाजिक कार्यासाठी दिली आहे. प्रसाद गेली ३० वर्षे पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी इतर सामाजिक कार्येही केली आहेत. भारतासाठी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचे प्रसाद यांचे स्वप्न होते. यातूनच त्यांनी खेळाडूंना मदत व्हावी म्हणून ५० एकर जागेत स्पोर्टस युनिव्हर्सिटीही सुरू केली आहे. अजून ५० एकर जागेत दुसरी स्पोर्टस युनिव्हर्सिटीही सुरू करण्यात येणार आहे.