मॉस्को - रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका प्रवासी विमानाला आपातकालीन लँडिंग करताना अचानक आग लागली. या दुर्घटनेत ४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोच्या शेरिमीमेटयेवो विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. एअरोफ्लोट एअरलाइन्स कंपनीचे हे विमान होते.
रशियात प्रवासी विमानाला आग; ४१ प्रवाशांचा मृत्यू - russia
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
या विमानामध्ये एकूण ७३ प्रवाशी आणि ५ क्रू मेंबर होते. ७८ प्रवासांपैकी ३७ प्रवासी या भीषण दुर्घटनेतून वाचले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रशियाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे विमान मॉस्कोच्या विमानतळावरून रशियाच्या म्युरमनसक शहराकडे उड्डाण करत होते. उड्डाण केल्यानतंर विमानाच्या मागील बाजूच्या यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान लगेच विमानतळाच्या दिशेने फिरले. याप्रसंगी हे भीषण अपघात झाला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. नेमकी कशामुळे ही दुर्घटना घडली ते अजून स्पष्ट झालेले नाही. वैमानिकाने हवाई सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले का ? त्यादृष्टीनेही समिती तपास करणार आहे. बचावलेल्या प्रवाशांनी खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले.