श्रीनगर - काश्मीरमधील माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी'जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाची स्थापना केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. फैजल यांनी जम्मू-काश्मीरमधील अनेक हत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. तसेच, केंद्र सरकारची जनतेसाठी काही करण्याची मनापासून इच्छा नसल्याचे म्हटले होते.
जम्मू-काश्मीर : माजी आयएएस शाह फैजल यांनी केली नव्या पक्षाची स्थापना - new party
फैजल यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'राजकीय वचनबद्धते'चे कौतुक केले. 'या दोघांनीही अनेक राजकीय आव्हानांचा सामना केला आहे. मात्र, ते झुकलेले नाहीत,' असे ते म्हणाले.
फैजल यांनी जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जावर आक्रमण केले जात असल्याचा आरोप केला.'मी लोकांना मदत करण्यासाठी शासकीय नोकरी स्वीकारली होती. मात्र, येथील परिस्थितीने मला नोकरी सोडून राजकारणात येण्यास भाग पाडले,' असे त्यांनी पक्षाच्या स्थापना समारंभावेळी म्हटले. फैजल यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'राजकीय वचनबद्धते'चे कौतुक केले. 'या दोघांनीही अनेक राजकीय आव्हानांचा सामना केला आहे. मात्र, ते झुकलेले नाहीत,' असे ते म्हणाले.
'जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता हे पक्षाचे ध्येय असणार आहे. तसेच, राज्यातील समस्यांचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण आणि लोकांच्या इच्छा-आकांक्षा यासाठी पक्ष काम करेल,' असे फैजल यांनी म्हटले आहे.