नवी दिल्ली -माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अचानकपणे नाजूक झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ राजकारणी होत्या. त्यांनी २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्रीपद भूषवले. हा पदभार स्वीकारणाऱ्या त्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतरच्या दुसऱ्या महिला होत्या.
LIVE UPDATES : ( सकाळी १० पर्यंत)
9.05 - सुषमा यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासोबत काम केले - लालकृष्ण अडवाणी
माझ्या अगदी जवळच्या सहकारी गेल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. सुषमा स्वराज या अशा व्यक्ती आहेत, की त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासोबत काम केले आहे. ज्यावेळी मी भाजपचा अध्यक्ष होतो त्यावेळी सुषमा एक उत्कृष्ट तरुण कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे मी त्यांना माझ्या टीममध्ये घेतले होते, अशा शब्दात लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहीली.
9.00 - दिल्ली सरकाराने सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यामुळे दोन दिवसाचा दुघवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यामध्ये कुठलीही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. मात्र, इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये होणाऱ्या अंगणवाडी कार्यक्रमासह स्रव सरकारी कार्यक्रम ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील.
8.55 - योगगुरू रामदेव बाबा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.
8.45- रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुषमा स्वराज्य यांचे निधन झाल्याने दुःख व्यक्त केले. तसेच आपल्या देशातील जनतेप्रति सहानुभूती व्यक्त केली.
8.10 -सुषमाजी यांच्या अचानक जाण्याने धक्का बसला. मी त्यांना १९९० पासून ओळखते. त्यांच्या आणि माझ्या विचारसरणीमध्ये फरक असला तरी आम्ही संसदेमध्ये खपू वेळ सोबत घालवला आहे. त्या एक उत्कृष्ट राजकारणी, नेत्या होत्या. त्यांची वेळावेळी आठवणी येईल, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला.
7.40-नोबेल पुरस्काराचे मानकरी कैलास सत्यार्थी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
7. 30 -ज्येष्ठ राजकीय नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, असे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली म्हणाले. त्यांनी आपले सरकार आणि जनतेप्रति सहानुभूती व्यक्त केली.
7.25 - 'त्यांना' भेटायची इच्छा राहून गेली - खासदार रमा देवी
'त्यांच्या आत्मत्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करते. सुषमाजी प्रत्येक काम हिमतीने करत होत्या. मी बिहारला होते. त्यावेळी त्यांना भेटले होते. मात्र, दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांना भेटायची खूप इच्छा होती. काही खासदारांना म्हटले होते की, आपण त्यांना भेटून येऊ. मात्र, सारखे सभागृहामध्ये उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. त्यांना भेटायची इच्छा राहून गेली', अशी खंत खासदार रमा देवी यांनी व्यक्त केली. तसेच त्या भावूक देखील झाल्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी प्रार्थना देखील रमादेवी यांनी केली.