नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी अल्पसंख्यांक समुदायांपुढे वाढणाऱ्या चिंतांबाबत भाष्य केले आहे. देशातील पारंपरिक पद्धतीने सुरू विविधतेच्या विचारांना महत्व देण्याऐवजी 'एकरूपतेला' अधिक महत्व दिले जात आहे. शुक्रवारी 'विजिबल मुस्लिम - इनविजिबल सिटिजन : अंडरस्टेंडिंग इस्लाम इन इंडियन डेमोक्रेसी' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
देशात विविधतेला महत्व देण्याऐवजी एकरूपतेला अधिक महत्व दिले जात आहे - खुर्शीद - equality for integration
खुर्शीद म्हणाले, देशाच्या लोकशाहीत एखाद्या विचारावर मतभेद आणि सहमती दर्शविण्यासाठी जागा नसेल तर त्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करायला हवेत. एखाद्या मतभेदावर विचारांचे देवान घेवान होऊ शकत नसेल तर ते लोकशाहीस घातक आहे.

देशात 'एकरुपता ही एकते पेक्षा विभिन्न असल्याचे सांगण्यासाठीच जोर लावला जात आहे. मी पारंपरिक विचारांवर विश्वास ठेवतो, तुमच्या पैकीही हा विश्वास ठेवत असतील की देशाच्या एकतेसाठी विविधता आवश्यकच आहे. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी खासदार असदउद्दीन ओवैसी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली हे देखील उपस्थित होते.