गांधीनगर - नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवरातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नर्मदा नदीवरील धरण इतिहासात पहिल्यांदाच १३८.६२ मीटर पाणी पातळी ओलांडणार आहे. सध्या धरणात १३७.९९ मीटर पाणी पातळी आहे.
मागील काही दिवसात गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, इंदिरा सागर आणि ओमकारेश्वर धरण या ठिकाणांहून ७ लाख ३० हजार ५५८ क्युसेक इतके पाणी सरदार सरोवरात येत आहे. धरणाच्या २३ दरवाजे ४.१० मीटरने उघडण्यात आले आहेत. ७ लाख ३० हजार ९१५ क्युसेक पाणी नर्मदा नदी पात्रात सोडले जात आहे.