पटणा : बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना नेते मंडळी एकमेकांवर टीका करण्यात व्यग्र आहेत. अशातच तरुण गायिकांनीही या वादात उडी घेतली आहे. नेहा राठोड आणि मैथिली ठाकूर या तरुण गायिकांमध्ये गाण्यांचं 'वॉर' सुरू झालंय. नेहा सिंह राठोडने यासंबंधी ट्विट करत मैथिलीला लोकांच्या हितांशी तडजोड न करण्याचा सल्ला दिलाय.
काही दिवसांपूर्वी गायिका नेहा सिंह राठोडने एक लोकगीत गायले होते. 'बिहार में का बा'? या नावाने प्रसारित झालेल्या गाण्याच्या व्हिडीयोने सोशल मीडियावर पसंती मिळवली. मनोज वाजपेयी यांच्या 'बंबई में का बा'? या गाण्यावर आधारित हे गाणं आहे. या गाण्यातून नेहा सिंह राठोडने बिहार सरकारला विकास कामांबाबत प्रश्न विचारले होते. याला प्रत्युत्तर देत तरुण गायिका मैथिली ठाकूरने 'बिहार में ई बा'? हे गाणं रेकॉर्ड केलंय. यानंतर गायिकांच्या 'सोशल मीडिया वॉर'ला सुरुवात झाली आहे.