महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये पावसाचा कहर, पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

अररिया हा बिहारमधील सर्वात मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याच्या शहरापासून 13 किमी अंतरावर पुरणदाह गाव आहे. गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती

By

Published : Jul 15, 2019, 2:20 PM IST

अररिया (बिहार) - राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अररिया हा बिहारमधील सर्वात मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याच्या शहरापासून 13 किमी अंतरावर पुरणदाह गाव आहे. गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नुकसान सोसावे लागते. मात्र, सरकारकडून स्थानिकांना देण्यात येणारी निवडणूकीतील आश्वासने ही फक्त अधिकाऱ्यांच्या कागदी कारवाईपुरतीच मर्यादित होऊन जाते.

बिहारमध्ये पावसाचा कहर, पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

पावसाचा जोर इतका जास्त आहे की, यामध्ये एक दुचाकी वाहून गेली. त्यांनतर तिला शोधण्याचा प्रयत्न होऊनही ती मिळाली नाही. या पावसाच्या जोरामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. एक कुटूंब आजारी असून सकाळपासून रस्त्यावर अडकले आहे. प्रशासनाला माहिती देण्यात आली. मात्र, तरीही प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पुरामुळे संकटात सापडलेले नागरिक एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क जिल्ह्याच्या मुख्य शहराशी संपर्क तुटला आहे. येथील नागरिक कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे लोक बिस्किटे खात संकटाला तोंड देत आहेत. प्रशासनाला कळविण्यात आल्यावरसुद्धा अजून एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details