नवी दिल्ली - जोरदार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूर आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड राज्याला पावसाने झोडपून काढले आहे. या राज्यांमध्ये आपत्ती निवारण दलाचे पथक, हवाई दल आणि स्थानिक प्रशासन मदत करत आहे. पुरामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रात २७, केरळमध्ये २९ आणि कर्नाटकात ९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
RAIN UPDATE -
- केरळ - भारतीय लष्कराचे विमानतळ आयएनएस गरुडा नागरी विमान वापरासाठी खुले. कोची विमानतळ पाण्याखाली गेल्याने घेतला निर्णय.
- केरळ - ३१५ मदत केंद्रामध्ये २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी आश्रय घेतला आहे.
- नवी दिल्ली - देशभरातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृह मंत्रालयाची महत्त्वाची बैठक सुरु
- कर्नाटका - घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या पुरपस्थितीची मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पांनी हवाई पाहणी केली.
- केरळ - भारताप्पुझा नदीला पूर आल्याने पत्तंबी पूलावर पाणी. वाहतूक बंद.
- केरळ: एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवत्तुपुझा गावामध्ये पाणी शिरले. संपूर्ण परिसरामध्ये साचले पाणी.
- कर्नाटक: पुरामुळे एअर इंडियाच्या ६ विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने दिरंगाई.
- उत्तराखंड- चिमोली जिल्ह्यातील देवाल भागात मुसळधार पाऊस. एक महिला आणि लहान बालकाचा मृत्यू. आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल.