मदुराई - तामिळनाडूीतल मदुराई जिल्ह्यात आज(शुक्रवार) फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कूलुपट्टीजवळील चेंगुलाम भागात हा स्फोट झाला. फटाके बनविण्यासाठी तयार केलेल्या रसायनाच्या मिश्रणाने पेट घेतल्यानंतर स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ५ जणांचा मृत्यू - तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात आग
तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट झाला. रसायनांच्या मिश्रणाने पेट घेतल्यानंतर स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पाचही कामगारांचा कोळसा झालेले मृतदेह स्फोटानंतर घटनास्थळी सापडले. तर काहीजण जखमी झाले आहेत. इतर कामगार बाहेर पळाल्यामुळे या अपघातातून थोडक्यात बचावले. स्फोटानंतर कारखान्याला आग लागली होती. त्यामुळे आग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
सुमारे ५० कामगार या कारखान्यात काम करत होते. अलगरस्वामी नामक व्यक्तीचा हा कारखाना आहे. फटाके तयार करत असताना ज्वलनशील रसायनांचे मिश्रण तयार करण्यात येत होते. मात्र, यावेळी घर्षण झाल्याने रसायनाने आग घेतली. जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत.