कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पाच जण जखमी - TMC
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती आहे.
स्थानिक टीएमसी नेता आणि ग्राम पंचायतीचे सरपंच यांचे पती दिलीप राम यांची अज्ञात व्यक्तीनी गोळी घालून हत्या केली. हुगळीच्या बेनघाल रेल्वे स्थानकांमध्ये जखमी अवस्थेत ते सापडले. मात्र कोलकातामधील एका हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांचा मृत्यू झाला आहे. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये अटीतटीची लढाई सुरू असल्याचं चित्र आहे. बंगालमध्ये राजकीय हिंसेनं टोक गाठलं आहे. निवडणूक जाहीर होण्यापर्यंत गेल्या चार वर्षांमध्ये दंगलीच्या आणि हिंसेच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर निवडणुकांनंतर ही हिंसा थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.