श्रीनगर - उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सैन्याने ९ सप्टेंबर २०१६ पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झालेला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, बालाकोट एअर स्ट्राईक हेही एक मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'राजकीय पक्ष सर्जिकल स्ट्राईक किंवा हवाई स्ट्राईक विषयी काय म्हणतात, यावर मी काही बोलणार नाही. त्यांना सरकार उत्तर देईल. मी तुम्हाला जे सांगितले, तेच तथ्य आहे,' असे सिंग म्हणाले.
पक्ष काहीही म्हणतील; मात्र, २०१६ पूर्वी सर्जिकल स्ट्राइक झाले नाहीत - लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह - shrinagar
'सैन्याच्या कारवाई विभागाचे महासंचालकांनी काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाचे हेच उत्तर दिले होते,' असे सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
'सैन्याच्या कारवाई विभागाचे महासंचालकांनी काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाचे हेच उत्तर दिले होते,' असे सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी संपुआचे सरकार असतानाही सर्जिकल स्ट्राईक्स झाले असल्याचे म्हटले होते. या निवडणुकीत भाजपने प्रचार करताना सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दाही वापरला होता. माजी लष्कर प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचे सांगत काँग्रेसवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने संपुआ सरकारच्या काळात ६ सर्जिकल स्टाराईक्स झाल्याचा दावा केला होता. त्याआधीच्या अटल सरकारमध्येही ३ सर्जिकल झाल्याचेही म्हटले होते. आतापर्यंत लष्कर किंवा सरकारकडून काँग्रेसच्या दाव्यांचे खंडन करण्यात आले नव्हते.
बालाकोट एअर स्ट्राईक हे मोठे यश
बालाकोट येथील दहशतवादी तळांवर शत्रूच्या भूमीवर भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक केला. तेथील तळांना उद्ध्वस्त केले, असे सांगत सिंग यांनी हवाई दलाचे कौतुक केले.
सीमेपलीकडे दहशतवादाची पाळेमुळे अजूनही घट्टच
'पाकिस्तानकडून एलओसीवर भारतविरोधी कारवाया वारंवार सुरूच असतात. मात्र, सध्या जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सीमा पार घुसखोरी, अंमली पदार्थांची तस्करी, खोट्या नोटा चालवणे आदी कुरापती काढणे पाककडून चालूच आहे. ते भारताविरोधात 'छुपे युद्ध' सुरूच ठेवू इच्छितात. मात्र, त्यांचे मनसुबे उधळून लावण्यास आम्ही सक्षम आहोत,' असे ते म्हणाले.
८६ दहशतवादी ठार, २० जणांची धरपकड
'मागील ४ महिन्यांत अनेक दहशतवादी दहशतवाद सोडून घरी परतले. तसेच, ते मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच, या वर्षी लष्कराने ८६ दहशतवाद्यांना ठार केले आहे. २० दहशतवाद्यांना पकडले आहे. दहशतवादाविरोधात अभियान सुरू आहे,' असे सिंग यांनी सांगितले.