नवी दिल्ली - जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले असताना, भारतातही शंभरच्यावर कोरोनाग्रस्तांची संख्या गेली आहे. अशातच लडाख येथे कार्यरत असणाऱ्या 'भारतीय लष्करा'च्या जवानालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थने दिलेल्या माहितीनुसार जवानाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची देखभाल करताना, जवानालाही कोरोनाची लागण झाली. देशात प्रथमच जवानाला कोरोना आजार झाला आहे.
कोरोना पोहोचला इंडियन आर्मी तळावर.. देशात प्रथमच जवानालाही कोरोनाची लागण
लडाख येथे कार्यरत असणाऱ्या 'भारतीय लष्करा'च्या जवानालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थने दिली आहे.
कोरोना पोहोचला इंडियन आर्मी तळावर.. देशात पहिल्यांदाच जवानालाही कोरोनाची लागण
घटनाक्रम -
- जवानाचे वडील इराणला गेले होते. त्यानंतर ते भारतात 27 फेबृवारीला पोहोचले. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना लडाख येथील हर्ट फॉउंडेशन येथे 29 फेबृवारीपासून क्वारंटाईन (देखरेखीखाली) करण्यात आले. त्यांची चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
- जवानही याच काळात म्हणजे 25 फेबृवारी ते 1 मार्चपर्यंत सुट्टीवर गेला होता. त्यानंतर 2 मार्चला पुन्हा कर्तव्यावर रूजू झाला. दरम्यान, त्याने आपल्या वडिलांची सेवासुश्रुषा केली होती.
- 7 मार्चला जवानालाही क्वारंटाईन करण्यात आले. 16 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर एसएनएम या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- आता, जवानाचे संपूर्ण कुटुंब एसएनएम या रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Last Updated : Mar 18, 2020, 4:28 AM IST