रांची - देशभरामध्ये कोरोनाचे 1 हजार 251 रुग्ण आढळून आले असले तरी झारंखड राज्यात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आज राज्यामध्ये एका परदेशी महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही महिला मेलेशियन असून रांची शहरातील खेलगाव, हिंदपिडी भागात तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
झारखंडमध्ये आढळला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण - कोरोना रुग्ण झारखंड
देशभरामध्ये कोरोनाचे 1251 रुग्ण आढळून आले असले, तरी झारंखड राज्यात कोरोनाग्रस्त एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आज राज्यामध्ये एका परदेशी महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना प्रतिकात्मक फोटा
आरोग्य सचिव नितीन मदन कुलकर्णी यांनी राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. मात्र, राज्यामध्ये एकाही स्थानिक व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही. सर्वात जास्त रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून आले आहेत.
भारतातील एकून कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये सुमारे 50 परदेशी नागरिक आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजस्थानात सर्वात प्रथम परदेशी नागरिकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.