महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सपा नेते आजम खान यांच्यावर म्हशी चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या कोतवाली शहरातील एका व्यक्तीच्या दोन म्हशी आणि दुसऱ्या व्यक्तीची एक म्हैस, अशा एकूण तीन म्हशी काही लोकांनी गौशाळेत नेण्यासाठी म्हणून नेल्या. तक्रारदार व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, ते लोक आजम खान यांचे समर्थक होते. आणि आजम खान यांच्याच गोशाळेमध्ये म्हशींना नेले जात आहे असे त्यांनी सांगितले होते.

By

Published : Aug 29, 2019, 7:43 PM IST

सपा नेते आजम खान यांच्यावर म्हशी चोरल्याचे गुन्हे दाखल

लखनऊ - समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांच्यावर आता म्हशीच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोतवाली शहरातील दोन व्यक्तींनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

सपा नेते आजम खान यांच्यावर म्हशी चोरल्याचा गुन्हा दाखल
सपा नेते आजम खान यांच्यावर म्हशी चोरल्याचा गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या कोतवाली शहरातील एका व्यक्तीच्या दोन म्हशी आणि दुसऱ्या व्यक्तीची एक म्हैस, अशा एकूण तीन म्हशी काही लोकांनी गौशाळेत नेण्यासाठी म्हणून नेल्या. तक्रारदार व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, ते लोक आजम खान यांचे समर्थक होते. आजम खान यांच्याच गोशाळेमध्ये म्हशींना नेले जात आहे, असे त्यांनी सांगितले होते.

त्यामुळे या व्यक्तींनी आजम खान यांच्यासह सहा कार्यकर्ते आणि २० ते ३० अज्ञात लोकांविरोधात पोलीस ठाण्यात म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कलम ५०४, ५०६, ४२७, ३९५, ४४८ आणि कलम ४९२ अशा कलमांअंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आजम खान यांच्यावर याआधीही भूमाफिया असल्याचा तसेच पुस्तक चोर असल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details