महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लडाख सीमारेषेवर भारत-चीन दरम्यान गोळीबार; करारानंतर पहिल्यांदाच शस्त्रसंधीचे उल्लंघन

जून महिन्यात गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले होते. तेव्हापासूनच सीमारेषेवर मोठा तणाव निर्माण झालेला आहे. अशातच झालेल्या या गोळीबारामुळे परिस्थिती आणखीनच चिघळण्याची चिन्हे आहेत.

भारतीय जवान
भारतीय जवान

By

Published : Sep 8, 2020, 5:05 AM IST

Updated : Sep 8, 2020, 7:12 AM IST

लडाख -पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवर तणाव कायम असून शस्त्रसंधीच्या करारानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये गोळीबार झाला आहे. पूर्व लडाख सेक्टरच्या पांगोंग सरोवराजवळ ही घटना घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भारतीय जवान आपल्या जागेवर सक्षमपणे उभे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारत-चीन सीमारेषेवर सुरू असलेल्या वादामुळे मागील तीन महिन्यांपासून दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर उभे आहे. सैन्यातील उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या असून, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. अशातच सीमारेषेवर भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखमधील पोगांग तलावाच्या दक्षिण बाजून चिनी चैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. या घुसखोरीला उत्तर देताना दोन्ही देशांमध्ये गोळीबार झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून उच्चस्तरीय सेना अधिकारी प्रकरणाची अधिक तपासणी करत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा -भारत-चीन सीमावादावर मुत्सद्दीपणेच उपाय शोधणे आवश्यक - परराष्ट्रमंत्री जयशंकर

Last Updated : Sep 8, 2020, 7:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details