महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 4, 2019, 7:52 AM IST

Updated : Nov 4, 2019, 12:36 PM IST

ETV Bharat / bharat

दिल्लीत चार मजली कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या २८ गाड्या घटनास्थळी

काल रात्री उशिरा दिल्लीत चार मजली कारखान्याला आग लागली. ही आग शेजारच्या इमारतीतही पसरली. अग्निशमन दलाच्या २८ गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे कार्य युद्धपाळीवर सुरू आहे.

दिल्लीत चार मजली कारखान्याला आग

दिल्ली - दिल्लीतील पीरागढी परिसरात काल रात्री उशिरा सौंदर्यप्रसाधनांच्या चार मजली कारखान्याला आग लागली. ही आग शेजारच्या इमारतीतही पसरली. अग्निशमन दलाच्या २८ गाड्या घटनास्थळी हजर असून आग आटोक्यात आली आहे. दरम्यान, आग विझवताना अग्निशमन दलाचे ३ कर्मचारी जखमी झाले आहेत.

दिल्लीत चार मजली कारखान्याला आग

आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलालाही पाचारण केले. यानंतर रात्रभर आग विझवण्याचे कार्य युद्धपाळीवर सुरू होते.

या आगीत लाखो रुपयांचा माल जळून गेला आहे. आणखी दोन कारखानेही जळून खाक झाले आहेत. मात्र, जीवितहानीचे वृत्त नाही. कारखान्याची इमारत कोसळली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Last Updated : Nov 4, 2019, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details