नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स रुग्णालयामध्ये आग लागली होती. रुग्णालयातील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन दलाला यश आले असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे.
दिल्लीमधील एम्स रुग्णालयात लागलेल्या आगीवर नियंत्रण; शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स रुग्णालयामध्ये आग लागली होती.
दिल्लीमधील नामांकित एम्स रुग्णालयामध्ये आग
आगीच्या घटनेमुळे लॅब बंद करण्यात आली असून रुग्णालयात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान हे दिल्लीतील नामांकित रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत.
Last Updated : Aug 17, 2019, 8:34 PM IST