नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. करोलबाग येथील या आगीमध्ये आतापर्यंत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजते.करोलबाग येथील आग अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच ११ लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली आग; आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू, चिमुकल्यासह महिलेची इमारतीवरुन उडी
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच ११ लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
जवळपास ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ३० बंबांसह घटनास्थळावर पोहोचून आगीवर नियंत्रण आणले आहे. यासह बचाव कार्य पूर्ण झाले आहे. जिन्यावर लाकडाचा वापर करण्यात आलेला असल्याने लोकांना बाहेर पडण्यासाठी त्याचा वापर करता आला नाही. अग्निशामक विभागाचे उपप्रमुख सुनिल चौधरी म्हणाले, की आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. हॉटेलमध्ये मृतदेह असतील तर त्यांचाही शोध घेत आहोत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉटेलच्या २ कर्मचाऱ्यांनी बचावासाठी ४ थ्या मजल्यावरुन उडी मारल्याचाही प्रकार झाला. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळणे बाकी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.