महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अजमेर-दिल्ली महामार्गावर ४ ट्रकला आग, होरपळून एकाचा मृत्यू - ajmer-delhi-highway

बाजूला उभ्या असलेल्या दोन्ही ट्रकचालकांनी बाहेर उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, अपघातग्रस्त ट्रकमधील एका चालकाचा होरपळून मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर भाजला आहे.

अजमेर-दिल्ली महामार्गावर ४ ट्रकला आग

By

Published : Jun 20, 2019, 2:23 PM IST

जयपूर- राजस्थानची राजधानची जयपूरनजीक हरमाडा गावाजवळ अजमेर- दिल्ली महामार्गावर आज (गुरुवार) सकाळी ४ ट्रकला अचनाक आग लागली. या आगीत एका जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर भाजला आहे.

दिल्ली-अजमेर महामार्गावर आज पहाटे एका रसायनाचा टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोर चालणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेमुळे टँकरला आग लागली. टँकरने पेट घेतल्याने दोन्ही ट्रकलाही आग लागली. आगीचे स्वरुप वाढत जाऊन तिथे उभ्या असलेल्या इतर दोन ट्रकवरही ठिणग्या उडाल्याने त्यांनीही पेट घेतला.

बाजूला उभ्या असलेल्या दोन्ही ट्रकचालकांनी बाहेर उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, अपघातग्रस्त ट्रकमधील एका चालकाचा होरपळून मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर भाजला आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून आग नियंत्रणात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details