बंगळुरू - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून 'पीएम केयर्स फंड'बाबत करण्यात आलेल्या टिप्पणीबाबत हा एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये एफआयआर - सोनिया गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील शिवमोगा पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून 'पीएम केयर्स फंड'संदर्भात करण्यात आलेल्या एका टिप्पणीविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संकटामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. यातच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध कर्नाटकमधील शिवमोगा पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 'पीएम केयर्स फंड'संदर्भात करण्यात आलेल्या एका टिप्पणीविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ११ मे रोजीएक ट्विट करून पीएम केयर्स फंडाच्या पारदर्शकतेवरून काही टिप्पणी आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या ट्विटच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.