नवी दिल्ली -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अडचणीत सापडले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत एमएसएमई उद्यागाची व्याख्या बदलण्यात आली आहे. त्यामुळे गंतवणुक आणि उलाढाल वाढली असली तरी उद्योगांना फायदे मिळणार आहेत.
लघू, सुक्ष्म मध्यम उद्योंगाची व्याख्या बदलली
- १ कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि ५ कोटींपर्यंतची उलाढाल असणाऱ्या उद्योगांना सुक्ष्म उद्योग समजले जाणार
- १० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेले आणि ५० कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगांना लघू उद्योग म्हटले जाणार आहे.
- २० कोटी रुपये गुंतवणूक आणि १०० कोटींपर्यंत व्यवहार करणाऱ्या उद्योगांना मध्यम उद्योग म्हटले जाणार आहे. यामध्ये सेवा क्षेत्र आणि उद्योग या दोन्हींचा समावेश असणार आहे.