महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आपल्या वैयक्तिक हितापेक्षा सामाजिक व राष्ट्रीय हिताला प्रथम प्राधान्य देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे' - ishvarchandra

साधी राहणी व उच्च विचारसरणी यांचे उदाहरण म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर हे आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीतील योगदानामुळे त्यांचा आदर केला जातो. पददलित आणि गरिबांसाठी त्यांच्या मनात अपार प्रेम होते. त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत शिक्षणाचे दार उघडले.

ईश्वरचंद्र विद्यासागर

By

Published : May 17, 2019, 7:56 PM IST

आपल्या वैयक्तिक हितापेक्षा सामाजिक आणि राष्ट्रीय हिताला प्रथम प्राधान्य देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हे शब्द आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे. ज्यांच्या पुतळ्याची विटंबना कोलकाता येथे १४ मे रोजी काही समाजकंटकांनी केली. जे घडले ते दुर्दैवी आहे. आता गरज आहे ती मानवतावादी, बुध्दीवादी असणाऱया विद्यासागर यांच्या विचारांवर चालण्याची.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म एका गरीब ब्राम्हण कुटुंबात २६ सप्टेंबर १८२० रोजी झाला. त्यांच्या मृत्यूच्या १०० वर्षांनंतरही विद्यासागर यांचे विचार सर्व बंगाली तसेच भारतीयांना प्रेरणा देणारे आहे. बंगाली समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुनर्जीवन करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विद्यासागर यांनी १८५९ मध्ये शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. ही संस्था कोलकात्यामधील मध्यमवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देत होती. १९१७ मध्ये या संस्थेचे नाव विद्यासागर महाविद्यालय असे ठेवण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या मते, ईश्वरचंद्र हे फक्त शिक्षणाचे सागर नाही तर ते करुणा, उदारता आणि इतर अनेक गुणांचे सागर आहेत. बंगालधील उत्तुंग व्यक्तीमत्वात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा समावेश होतो.

साधी राहणी व उच्च विचारसरणी यांचे उदाहरण म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर हे आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीतील योगदानामुळे त्यांचा आदर केला जातो. पददलित आणि गरिबांसाठी त्यांच्या मनात अपार प्रेम होते. त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत शिक्षणाचे दार उघडले.

विद्यासागर यांच्या आईचे नाव भागवतीदेवी असे होते. त्यांचे वडील ठाकूरदास बंदोपाध्याय हे एका व्यावसायिक संस्थेत कारकून म्हणून काम करत होते. त्यांनी त्यांच्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी १८२९ मध्ये संस्कृत महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण करतानाच त्यांनी अलंकारशास्त्र, वेद, वेदांत आणि भारतीय तत्वज्ञान यात ते पारंगत झाले. विद्यासागर यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. जरी ते संस्कृत भाषेचे पंडित होते, तरी त्यांनी आपल्या लेखनातून बंगाली भाषेला संस्कृत भाषेच्या प्रभावातून मुक्त केले.

ईश्वरचंद्र विद्यासागर हे राजा राममोहन रॉय यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे होते. भारतामध्ये महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे सुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महिलांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सनातनी विचारांच्या लोकांविरोधात लढा दिला. यातूनच त्यांनी कोलकाता येथे मुलींच्या ३५ शाळांची उभारणी केली.

त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. इतकेच नाही शास्त्रामध्ये विधवा पुनर्विवाहाची परवानगी दिल्याचे त्यांनी सनातनी लोकांना पटवून दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे जुलै १९५६ मध्ये हिंदू पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आला. राजकारण हे विद्यासागर यांचा प्रांत नसताना त्यांना ओढण्यात येत आहे, हे विसंगत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details