महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आम्ही भारतीयच; मात्र, ३५ अ आणि ३७० ही कलमेही हवीत - फारूख अब्दुल्ला - jk

फारूख अब्दुल्ला यांनी 'आम्ही भारतीयच आहोत. मात्र, ३५ अ आणि ३७० ही कलमेही हवीत. कारण या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे. ही कलमे हटवण्याची काही गरज नाही. आम्ही भारतीय असलो तरी ही कलमे आमच्यासाठी महत्त्वाची आहेत,' असे म्हटले आहे.

फारूख अब्दुल्ला

By

Published : Jul 29, 2019, 10:25 PM IST

नवी दिल्ली - नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी 'आम्ही भारतीयच आहोत. मात्र, ३५ अ आणि ३७० ही कलमेही हवीत. कारण या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे. ही कलमे हटवण्याची काही गरज नाही. आम्ही भारतीय असलो तरी ही कलमे आमच्यासाठी महत्त्वाची आहेत,' असे म्हटले आहे. त्यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधला.

या वक्तव्याच्या एक दिवस आधी त्यांनी काश्मीर खोऱ्यात सरकारने पाठवलेल्या १० हजार जवानांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, राज्यात सध्या शांततेचे वातावरण आहे, असा दावा करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवण्यात आल्याने संशय निर्माण होत असल्याचे म्हटले होते. याशिवाय, शिवाय राज्यात तत्काळ विधानसभा निवडणूक व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली होती.'राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवून जनतेच्या मनात दहशत का निर्माण केली जात आहे? जर कलम '३५ अ' आणि कलम ३७० हटवले जात असेल तर, घटनेच्या प्रत्येक कलमाला हटवावे लागेल. यामुळे १९४७ च्या काळात पुन्हा जावे लागेल,' असेही अब्दुल्ला म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details