नवी दिल्ली - शेतकऱ्यांशी संबधित तीन अध्यादेशांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघाकडून दिल्लीतील जंतर-मंतर समोर अंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तीन अध्यादेशांचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचे संसदेबाहेर आंदोलन - राष्ट्रीय किसान महासंघ
राष्ट्रीय किसान महासंघाकडून दिल्लीतील जंतर-मंतर समोर अंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी संबधित तीन अध्यादेशांचा विरोध दर्शवण्यासाठी हे अंदोलन करण्यात येत आहे.
मोदी सरकारकडून हे तिन्ही अध्यादेश संसदेत मंजूर करण्यात येतील. मात्र, शेतकऱ्यांनी हे अध्यादेश नाकारले आहेत, असे राष्ट्रीय किसान महासंघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा म्हणाले.
शेतकऱ्याने मिळकत वाढवण्याच्या दृष्टीकोनातून तीनही अध्यादेश काढण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यात शेतकरी व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, कृषी (सबलीकरण आणि संरक्षण) हमीभाव करार आणि कृषी सेवा विधेयक, वस्तू (संशोधन) विधेयक 2020 यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी सुधारणा कार्यक्रमांअंतर्गत हे तीन अध्यादेश सरकारकडून मांडण्यात आले आहेत.