नवी दिल्ली : अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने (एआयकेएससीसी) शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले. शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. समितीने मोदी आणि तोमर यांना हिंदीमध्ये वेगवेगळी पत्रं लिहीत हे स्पष्ट केले.
शेतकरी आंदोलनामुळे विरोधी पक्ष झाले जागे..
शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी असा आरोप केला होता, की विरोधी पक्षातील नेते शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यावर प्रत्युत्तर देत एआयकेएससीसीने ही पत्रं लिहिली आहेत. "शेतकऱ्यांना कोणताही पक्ष आंदोलन करण्यास सांगत नसून, शेतकरी स्वतःच केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. उलट, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच विरोधी पक्षांनी आपली मतं बदलली आहेत" असे या पत्रात म्हटले आहे.
२४ दिवसांपासून सुरुये आंदोलन..