महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीतील 'या खास' दुकानातले 'पान' खाणार डोनाल्ड ट्रम्प, जाणून घ्या काय आहे विशेष - paan

हे पानाचे दुकान १९४३ पासून सुरू आहे. या दुकानात आत्तापर्यंत सर्वसाधारण नागरिकांबरोबरच राष्ट्रपती भवनातूनही पानाच्या ऑर्डर येतात. आमच्या दुकानात वेगवेगळ्या फ्लेवरचे पान मिळतात. मात्र, विविध फ्लेवरचे पान बनवताना आम्ही कुठलाही रासायनिक पदार्थांचा वापर करत नाही. त्यामुळे येथील पान तुम्ही फेकून न देता पूर्ण संपवाल.

'या खास' दुकानातील पान खाणार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
'या खास' दुकानातील पान खाणार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Feb 23, 2020, 7:38 PM IST

नई दिल्ली - तुम्ही पान तर खाल्लंच असाल. दिल्लीमध्ये असे एक दुकान आहे जेथील पान हे इतके प्रसिद्ध आहेत की सामान्यच नव्हे तर, अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी याची चव चाखली आहे. दिल्लीत सन १९४३ पासून देवी प्रसाद पांडेय यांचे 'पाना'चे दुकान आहे. या दुकानाचे विशेष म्हणजे येथे सर्वसाधारण नागरिकांपासून देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत सर्वांनीच या ठिकाणी हजेरी लावली आहे.

आश्यर्य वाटलं ना..! हो हे खरं आहे. पांडेयजींच्या या पानाच्या दुकानात देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंतच्या अनेकांनी या ठिकाणी येऊन पानाचा आस्वाद घेतला आहे. तर, आता या दुकानातील पान खाणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव जोडले जाणार आहे. 'ईटीव्ही भारत'ने या पान दुकानाचे मालक देवी प्रसाद पांडेय यांच्याशी याबाबत खास बातचीच केली आहे.

'या खास' दुकानातील पान खाणार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पांडेय जी म्हणाले, हे पानाचे दुकान १९४३ पासून सुरू आहे. या दुकानात आत्तापर्यंत सर्वसाधारण नागरिकांबरोबरच राष्ट्रपती भवनातूनही पानाच्या ऑर्डर येतात. आमच्या दुकानात वेगवेगळ्या फ्लेवरचे पान मिळतात. मात्र, विविध फ्लेवरचे पान बनवताना आम्ही कुठलाही रासायनिक पदार्थांचा वापर करत नाही. त्यामुळे येथील पान तुम्ही फेकून न देता पूर्ण संपवाल.

हेही वाचा -नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचे सुरक्षा करार..

पांडेय यांच्या दुकानातील पान इतके प्रसिद्ध आहेत की, देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्रीपासून तर पंतप्रधान मोदी यांनीही येथील पानाचा आस्वाद घेतला आहे. या दुकानातून पान खाणाऱ्या अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे फोटो देखील दुकानाच्या गेटवर लावण्यात आलेले आहेत. तर, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असून त्यांनाही पांडेय यांच्या दुकानातील पान सादर केले जाणार आहे. पांडेय यांचे सुप्रसिद्ध पान ट्रम्प यांना कितपत आवडते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

हेही वाचा -डोनाल्ड ट्रम्प यांचे हवेतील व्हाईट हाऊस आणि बीस्ट कार, ही आहेत वैशिष्ट्ये

ABOUT THE AUTHOR

...view details