हाथरस (उत्तर प्रदेश)- येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रविवारीपासून पीडित मुलीच्या कुटुंबाची आणि साक्षीदारांची सुरक्षा सीआरपीएफकडे देण्यात आली आहे. कमांडंट मनमोहन सिंग यांच्यासह 239 व्या बटालियन कंपनीच्या 80 सैनिकांनी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे.
आता सीआरपीएफचे जवान पीडित मुलीचे घर आणि आसपासच्या परिसरात तैनात असणार आहे. शनिवारी सीएपीएफच्या कमांडेटने गावात येऊन सुरक्षेचा आढावा घेतला. रोहई गावातील एका शाळेत सीआरपीएफ जवानांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापुर्वी स्थानिक पोलिसांकडे पीडित मुलीच्या परिवाराच्या सुरक्षेची जबाबदारी होती. रविवारपासून पीडित मुलीच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफने स्वीकारली आहे.