महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाहतूक पोलीस भांडल्यामुळेच मुलाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला - कुटुंबीयांचा आरोप - penalties

वाहतूक पोलिसाने हुज्जत घातल्याने मुलाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असा आरोप नोयडा येथील मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलचंद शर्मा

By

Published : Sep 10, 2019, 1:54 PM IST

नवी दिल्ली - नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. पोलिसांनी नव्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. दंड वसूल करताना पोलीस आणि नागरिकांमध्ये अनेक ठिकाणी हुज्जतही होते. नोयडा येथे वाहतूक पोलिसाने केलेल्या भांडणामुळेच मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

वाहतूक पोलिसाने केलेल्या भांडणामुळेच मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला - कुटुंबीय
गौरव शर्मा (३५) असे मृत्यू झालेल्या यूवकाचे नाव आहे. शर्मा कुटुंबीय कारने सेक्टर ६२ येथे जात असताना पोलीस तपासणी दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवले होते. गाडीवर काठी मारुन गाडी थांबवल्यामुळे पोलिसांबरोबर भांडण झाले. वाहतूक पोलिसाने न्यायालयात नेण्याची धमकी दिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे मूलचंद शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीसांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गौरवला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पून्हा कैलास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गौरवला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे मुलचंद यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details