सोलन - लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याआधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींनी हिमाचल प्रदेशच्या सोलन येथे सभा घेतली. रॅलीनंतर राहुल गांधींनी मंचावरून उतरून ईटीव्ही भारतला सर्व प्रश्नांची हजरजबाबी उत्तरे दिली. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला.
प्र - बंगालमधील हिंसेविषयी आपल्याला काय म्हणायचे आहे ?
उ - मोदी जातील तिथे द्वेष पसरवताहेत...
प्र - निवडणुकीच्या निकालाविषयी धाकधूक वाटते का?
उ - मी माझे काम प्रामाणिकपणे केले आहे. आता निकाल येईल ते येईल. खूप मजाही येत आहे. जो जनतेचा निर्णय असेल, तो मान्य करेन. पंतप्रधान मोदींनी बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आणखी अनेक मुद्द्यांवर मोठमोठी आश्वासने दिली. यावर त्यांनी काहीही काम केले नाही. सध्या मोदी आंबे खाण्याविषयी बोलत आहेत. मोदींच्या रडारविषयी सांगा.
मीडियावर नाराजी व्यक्त करताना राहुल यांनी मीडिया मला योग्य प्रश्न विचारतो. मात्र, मोदींना 'आंबे कसे खाता,' याविषयी विचारले जाते, असे म्हटले. मीडियाने मोदींना कडक भूमिका घेऊन प्रश्न विचारावेत.
प्र - भाजप-काँग्रेस मुद्द्यांवर बोलत नाहीये
उ - काँग्रेस मुद्द्यांवरच बोलत आहे. मी बेरोजगारी, कर्जमाफी, शेतकऱ्यांची स्थिती, न्याय योजना, राफेल आणि अंबानी याविषयी बोललो आहे. मोदी मात्र, कधी आंबे खाण्याविषयी बोलतात. कधी माझ्या कुटुंबीयांना शिव्या देतात. सूड घेण्याची भाषा करतात. मोंदींना काँग्रेसने घेरले आहे. ते निवडणूक हरणार आहेत. त्यांच्याच मनात भीती आहे. माझ्या मनात द्वेष नाही. मी त्यांची गळाभेटच घेईन.
प्र - 'राष्ट्रभक्ती'च्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येईल का?
उ - भारताची अर्थव्यवस्था मोदींनी नष्ट केली आहे. हे देशभक्तीचे काम नाही. अर्थव्यवस्था ही भारताची सर्वांत मोठी शक्ती आहे. नोटाबंदी आणि जीएसटी हे देशभक्तीचे काम होते का? देशातील लघु उद्योगांना संपवणे ही देशभक्ती होती का? काँग्रेसने पुलवामा हल्ल्याचा आम्ही राजकारणासाठी वापर करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, मोदी हेच करत आहेत.
प्र - सत्तेत आल्यास मेहूल चौक्सीसारख्या लोकांविषयी तुमचे काय धोरण असेल?
उ - आमच्या असलेल्या धोरणाचे नाव 'न्याय' आहे. न्याय होणार... मोदींनी राफेल व्यवहारात ३० हजार कोटी रुपयांची चोरी करून ते अंबानींना दिले. लोकसभेत दीड तास या चौकीदाराने भाषण केले. मात्र, मोदी डोळ्याला डोळा भिडवू शकले नाहीत.
अंबानींना ३० हजार कोटी रुपये का दिले? फ्रान्सचे राष्ट्रपती मोदींनीच अनिल अंबानींना प्रोजेक्ट देण्यास सांगितल्याचे का म्हणत आहेत? मोदींनी भारतात विमाने का तयार होऊ दिली नाहीत? मोदींनी एचएएलकडून हा प्रोजेक्ट का काढून घेतला? हे प्रश्न राहुल यांनी विचारले.