बंगळुरू - महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडूतील मुख्य शहरात बॉम्बस्फोट होतील, असा इशारा कर्नाटक पोलीस महसंचलकांनी दिला होता. पण, ही केवळ अफवाच असल्याचे आता समोर आले आहे. कर्नाटक पोलिसांना चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या इशाऱ्यानंतर संबंधित राज्यातील शहरांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
ट्रक ड्रायव्हरचा खोडसाळपणा; महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याची निव्वळ अफवाच - पोलीस
स्वामी सुंदर मूर्ती नावाच्या एका ट्रक ड्राईव्हरन बंगळुरू पोलिसांना फोन करुन बॉम्बस्फोटाची शक्यता असल्याची माहिती दिली होती. ती व्यक्ती पोलिसांशी तामिळ आणि मोडक्या-तोडक्या हिंदीत बोलत होती. तामिळनाडून, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पद्दुचेरी, गोवा आणि महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती त्याने दिली.
स्वामी सुंदर मूर्ती नावाच्या एका ट्रक ड्राईव्हरन बंगळुरू पोलिसांना फोन करुन बॉम्बस्फोटाची शक्यता असल्याची माहिती दिली होती. ती व्यक्ती पोलिसांशी तामिळ आणि मोडक्या-तोडक्या हिंदीत बोलत होती. तामिळनाडून, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पद्दुचेरी, गोवा आणि महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती त्याने दिली. हे बॉम्बस्फोट रेल्वेगाडीत होतील असेही त्याने सांगितले. या हल्ल्यासाठी तामिळनाडुतील रामानाथापूरम येथे १९ दहशतवादी आल्याचा दावा त्याने केला होता.
या फोननंतर कर्नाटक पोलीस महासंचालकांनी सतर्कतेचा इशार दिला होता. मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पण, या माहितीच्या स्रोताचा तपास केल्यानंत खरी माहिती समोर आली. फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुरेंद्र मूर्ती असे असून ही व्यक्ती माजी सैनिक आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही अफवा त्याने का पसरवली, हे मात्र समजू शकले नाही. नुकतेच श्रीलंका येथे साखळी बॉम्बस्फोट झाले. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा आल्याने पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे.