महोबा- उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात काल (सोमवार) चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक मतदान यंत्र (ईव्हीएम) गायब झाल्याची घटना घडली आहे. यानंतर तत्काळ जिल्हा प्रशासनाने ईव्हीएमचा शोध सुरू केला आहे. ईव्हीएम शोधून देणाऱयास दहा हजारांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.
धक्कादायक..! मतदान केंद्रावरून ईव्हीएम गायब; शोधून देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस - harimpur
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर महोबा लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे. जिल्हा प्रशासनाने ईव्हीएमचा शोध सुरू केला आहे.
हमीरपूर महोबा लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान पार पडल्यानंतर मतदान अधिकारी पथक मतदान यंत्र घेऊन आले. तेव्हा पनवाडी ब्लॉकच्या नौगाव फदना येथील 127 क्रमांकाच्या बूथमधील ईव्हीएम मशीन गायब झाल्याचे आढळले. यानंतर जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाने फदना गावात ईव्हीएमचा शोध सुरू केला. मात्र, ईव्हीएम सापडले नाही. लाउडस्पीकरवरून मशीन गायब झाल्याची घोषणा करुन ईव्हीएम शोधणाऱ्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
फदना गावातील मतदान झाल्यानंतर बुथ प्रमुख कमलेश कुमार आणि मतदान अधिकारी शरद हे पॉलिटेक्निक ग्राउंडमध्ये ईव्हीएम जमा करण्यासाठी गेले, तेव्हा बूथ नबंर १२७ ची ईव्हीएम मशीव तेथे नव्हती. याप्रकारानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पथकाला रात्रभर त्याठिकाणी बसवून मशीनचा शोध सुरू केला होता.