गांधीनगर - गुजरात राज्यातील जुनागढ, अमरेली आणि भावनगर या तीन जिल्ह्यात आशियातील सिंहांचे सर्वात महत्वाचे 'गीर अभयारण्य' पसरलेले आहे. या गीर अभयारण्यातील सिंहांची दर पाच वर्षांनी गणना केली जाते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही गणना लांबण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : दर पाच वर्षांनी होणाऱ्या सिंह गणनेवर कोरोनाचे सावट
गुजरातच्या जुनागढ, अमरेली आणि भावनगर अशा तीन जिल्ह्यांत पसरलेल्या गीर अभयारण्यातील सिंहांची दर पाच वर्षांनी गणना केली जाते.
सिंह : गीर अभयारण्य
हेही वाचा...भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या पुढे; 53 जणांचा मृत्यू
दर पाच वर्षांनंतर गीर अभयारण्यातील जंगलचा राजा असणाऱ्या सिंहांची जनगणना केली जाते. राज्याच्या वनविभागाचा मोठा कर्मचारी वर्ग यासाठी तैनात केला जातो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूमुळे सगळे जगच थांबले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षी होणारी सिंहांची ही गणना थांबवली जाऊ शकते. अथवा ही गणना एक वर्षासाठी पुढे ढकलली जाऊ शकते.