मुंबई -मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीच्या दुर्गंधीमुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयात शनिवारी प्रकाश शर्मा यांची साक्ष झाली. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील 69 हजार प्राथमिक शिक्षक भरतीला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी सरकारला फटकारले आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांपूर्वीच गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर काँग्रेस पक्षाने खबरदारी म्हणून शनिवारी त्यांच्या अनेक आमदारांना संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या नजिकच्या रिसॉर्ट आणि बंगल्यांमध्ये हलविले आहे. यासह देशभरातील टॉप-१० घडामोडी वाचा...
- मुंबई - मुंबईकर कोरोना विषाणू, निसर्ग चक्रीवादळ यामुळे भयभीत झाला होता. त्यात आता पूर्व उपनगरात गॅस गळतीच्या दुर्गंधीमुळे मुंबईकरांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, गॅस कंपन्या या गॅस गळतीचा शोध घेत असून मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - मुंबईच्या पूर्व उपनगरात गॅस गळती, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- अहमदाबाद -19 जूनला होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकांपूर्वीच गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले. यानंतर काँग्रेस पक्ष सावध झाला असून त्यांनी शनिवारी त्यांच्या अनेक आमदारांना संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या नजिकच्या रिसॉर्ट आणि बंगल्यांमध्ये हलविले आहे. त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचू नये, यासाठी पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली.
सविस्तर वाचा -गुजरात राज्यसभा : तिघांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उर्वरित आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले
- नवी दिल्ली - अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील 69 हजार प्राथमिक शिक्षक भरतीला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीनी सरकारला फटकारले आहे. संपुर्ण भरती प्रक्रियेत सरकारचा निष्काळजीपणा समोर आला आहे, असा आरोप त्यांनी योगी सरकारवर केला.
सविस्तर वाचा -उत्तरप्रदेशातील शिक्षकांची मेगाभरती वादात, प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा
- बीड - अपघातातील गंभीर जखमी तरुण तडफडत असतानाही उपस्थित डॉक्टरांनी उपचार न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. त्यानंतर या दोन्ही जखमी तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गणेश देशमुख आणि सचिन भोसले असे मृतांची नावे असून हे दोघेही माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी आहेत.
सविस्तर वाचा -येथे माणुसकी ओशाळली; डॉक्टरांचा उपचारास नकार, जखमी तरुणांचा तडफडून मृत्यू
- मुंबई- गॅस गळतीच्या तक्रारीनुसार मुंबईच्या अग्निशमन दलाने यूएस विटामिन, गोवंडी तसेच पंत नगर पोलीस ठाणे परिसरात शोध घेतला पण, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गॅस गळती आढळून आली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.