महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - india china news

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

etv-bharat-top-10-news-at-11-pm
Top १० @ ११ PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jun 18, 2020, 1:00 PM IST

Updated : Jun 18, 2020, 10:59 PM IST

  • मुंबई - राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज (गुरुवार) १ हजार ६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे.

सविस्तर वाचा -दिवसभरात 3 हजार 752 कोरोनाबाधितांची वाढ; एकूण आकडा 1 लाख 20 हजारांच्या पुढे

  • हैदराबाद -चीनची अर्थव्यवस्था ढासळलेली असून त्यांना युद्ध परवडणारे नाही, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कमर आघा यांनी व्यक्त केले आहे. चीनची अर्थव्यवस्था व्यापारावर अवलंबून असून कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर निर्यात कमी झाली असल्याचे आघा म्हणाले.

सविस्तर वाचा -'चीनची अर्थव्यवस्था खराब स्थितीत, त्यांना युद्ध परवडणारं नाही'

  • ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेले सहा दिवस सलग शंभरच्यावर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आले होते. मात्र, आज एकाच दिवसात 212 रूग्ण आढळून आले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा -कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात 212 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

  • सांगली - आयुष्यात राजू शेट्टींना दुसऱ्याचे चांगले चिताईची बुद्धी परमेश्वर त्यांना देवो, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना खोचक टोला लगावला आहे. तसेच शेट्टींनी मिळणाऱ्या आमदारकीचे स्वागत करत आपण कोणाच्या आड मांजर सोडत नाहीत. मात्र, त्यांच्या पाठीवरचे मांजरांचे पोते आहे, अशा शब्दांत आमदार खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे.

सविस्तर वाचा -'ईश्वर करो अन् राजू शेट्टींना दुसऱ्यांचे पण चांगले चितायची बुद्धी मिळो'

  • मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद अनेक लोकांची मदत करत होता. आता अनलॉकनंतरही त्याने आपला मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे.

सविस्तर वाचा -चाहत्याच्या 'या' वागण्यावर सोनू सूद नाराज, केली पुन्हा असे न करण्याची विनंती

  • नवी दिल्ली -चीनच्या जाणीवपूर्वक आणि पूर्वनियोजित कृतीमुळे लडाखमधील गलवान व्हॅली परिसरात हिंसाचार झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या हालचाली नियंत्रण रेषेच्या आतमध्येच होत्या. मात्र, चीनने एकट्यानेच सीमेवरील 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

सविस्तर वाचा -चीनच्या पूर्वनियोजित कृतीमुळं सीमेवर हिंसाचार झाला - परराष्ट्र मंत्रालय

  • अयोध्या - राम मंदिराचे भूमीपूजन नियोजित तारखेनुसार 2 जुलैला होणार होते. मात्र, भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टने एक पत्रक जारी करून याची माहिती दिली आहे.

सविस्तर वाचा -भारत-चीन सीमावादामुळे राम मंदिराचे भूमीपूजन लांबणीवर...

मुंबई- कोरोना व्हायरसच्या कहरानंतर देशाची बाजारपेठ ठप्प झाली आहे. व्हायरसपासून बचाव व्हावा म्हणून अनेक उपक्रम आणि व्यवसाय बंद आहेत. याचाच भाग म्हणून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सिनेमा आणि टीव्हीचे शूटिंग थांबली होती. अनेक नियम आणि अटींचे पालन करीत या शूटिंगला अखेर परवानगी मिळाली आहे. मोठ्या अंतरानंतर टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू होत आहेत.

सविस्तर वाचा - २२ जूनपासून सुरू होणार टीव्ही मालिकांचे शूटिंग, नव्या स्वरुपात दिसणार एपिसोड्स

  • मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने केवळा भारतीयांनाच नाही तर परदेशातील चाहत्यांनाही दुःख झालंय. सुशांतला श्रद्धांजली वाहत इस्त्राईलच्या विदेश मंत्रालयाच्या जनरल आणि डेप्यूटी डायरेक्टर गिलाड कोहेन (Gilad Cohen) यांनी ट्विट केले आहे.

सविस्तर वाचा -इस्त्राईलने वाहिली सुशांतसिंहला श्रद्धांजली, म्हटले, 'सच्चा दोस्त'

  • मुंबई - सुशांतसिंह राजपूत १४ जूनला वांद्रे येथील घरामध्ये फॅनला लटकलेल्या मृतावस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तो काही दिवस डिप्रेशनमध्ये होता असे सांगितले जात आहे.

सविस्तर वाचा -सुशांतच्या घरी मिळाली डायरी, आत्महत्येच्या कारणांची होतेय चौकशी

Last Updated : Jun 18, 2020, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details