महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 news @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

etv bharat special top ten news stories at 9 pm
रात्री नऊच्या ठळक बातम्या!

By

Published : Jun 9, 2020, 10:55 AM IST

Updated : Jun 9, 2020, 9:00 PM IST

लडाख - भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान लडाखच्या पूर्वेककडील प्रांतात तणावपूर्ण वातावरण होते. चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश करून या ठिकाणी बंकर उभारल्याने दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर ठाकले होते. मात्र वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर, काही भागांतील सैन्य मागे घेण्याच्या प्रस्तावावर दोन्ही देशांचो एकमत झाले आहे. यामुळे भारत-चीन सीमावाद तात्पुरता निवळल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा -भारत-चीन सीमावाद; सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांचे एकमत!

नवी दिल्ली- भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री सिंधिया यांना दिल्लीतील 'मॅक्स हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे जाणवत असल्यामुळे सिंधिया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सविस्तर वाचा -भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू

रायगड - निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यानंतर या भागाचा दौरा केला. आज (मंगळवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दोन दिवसाचा कोकण दौरा करत असून आज ते रायगड दौैऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.

सविस्तर वाचा -'पत्र लिहिण्यापेक्षा राज्य आणि केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाकरिता धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार'

मुंबई - कोरोनाने निर्माण केलेले महाभयंकर संकट अद्यापही टळलेले नसताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मात्र १५ जूनपासूनच शाळा ऑनलाईन सुरू करण्याच्या हट्टाला पेटल्या आहेत. यासाठी त्यांनी एक पाऊलही मागे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली असल्याचे समजते.

सविस्तर वाचा -शालेय शिक्षण मंत्र्यांचा हट्ट; १५ जूनपासूनच सुरू करणार ऑनलाईन शाळा

मुंबई- आजपर्यंत आपण अस्मानी संकटे पाहिली, महापूर पाहिले, दुष्काळ सहन केला, डेंग्युसारख्या साथीही येऊन गेल्या. पण कोरोनाने आता जीवन-मरणाचा प्रश्न उभा केला आहे. या महामारीच्या संकटातून आपल्याला संपूर्ण समाजाला वाचवायचे आहे. हे खूप कठीण काम आहे. आपल्या वर्धापनदिनी आपण रक्तदान शिबीरांचे आयोजन करून गरज असलेल्या रुग्णांना मदत करुया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला उद्या दोन दशके पूर्ण होत आहेत.

सविस्तर वाचा -'महाराष्ट्राला उभारी देण्यासाठी वचनबद्ध होऊन काम करूया...'

मुंबई- गेल्या काही दिवसात सहा कॉरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह रुग्णालयातून गायब झाल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाच्या नातेवाईकांनी आणि किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यासंदर्भात सहा रुग्णांची माहिती पत्राद्वारे गृहमंत्री व आरोग्यमंत्री यांना किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा -मुंबईत कॉरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह रुग्णालयातून गायब; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई - महानगरपालिकेतील उपायुक्त पदावरील एका अधिकाऱ्याचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या अधिकाऱ्याला सोमवारीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. त्यामुळे ते घरीच होते. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा -मुंबई महापालिकेतील उपायुक्त पदावरील एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या खेळातील नियमांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. या नियमांमध्ये लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये घरगुती पंचांना मंजुरी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम.. लाळेच्या वापरावर बंदी, कसोटीत असणार पर्यायी खेळाडू

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि वरुण शर्मा यांच्या माजी व्यवस्थापक दिशा सालियान हिने आत्महत्या केली आहे. वृत्तानुसार सोमवारी त्याने मालाडमधील आपल्या अपार्टमेंटच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारुन आपला जीव दिला.

सविस्तर वाचा -सुशांत सिंग राजपूत आणि वरुण शर्माच्या माजी महिला मॅनेजरची आत्महत्या

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना' रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. याची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमा थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे हा सिनेमा कधी रिलीज होणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्यात आहे.

सविस्तर वाचा -बहुप्रतीक्षित 'गुंजन सक्सेना' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated : Jun 9, 2020, 9:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details