मुंबई -लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. या कारवाईत 44 कोटी किमतीचे बनावट भारतीय चलन आणि 4 कोटी 20 लाख रुपये विदेशी बनावटीचे चलन जप्त करण्यात आले... चीनचे राष्ट्रपती आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक यांनी संपूर्ण जगाविरोधात कट रचत, जगात कोरोना विषाणूचा फैलाव केला आहे, असा आरोप करत बिहारच्या एका वकिलाने त्यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे...काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- पुणे - लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 44 कोटी बनावट भारतीय चलन आणि 4 कोटी 20 लाख रुपये विदेशी बनावटीचे चलन जप्त करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी शेख अलीम गुलाब खान, सुनील भद्रीनाथ सारडा, रितेश रत्नाकर, तोफिल अहमद मोहमद इसाक खान, अब्दुल गणी रेहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गणी खान यांना ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सविस्तर वाचा -पुणे विमानतळ परिसरातून बनावट चलन जप्त, नोटांची किंमत 44 कोटी
- पश्चिमी चंपारण -चीनचे राष्ट्रपती आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक यांनी संपूर्ण जगाविरोधात कट रचत, जगात कोरोना विषाणूचा फैलाव केला आहे, असा आरोप करत बिहारच्या एका वकिलाने त्यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे. ही याचिका बेतिया न्यायालयाच्या मुराद अली नावाच्या वकिलांनी दाखल केली. महत्वाची बाब म्हणजे, त्यांच्या या याचिकेचा स्वीकार सीजेएम न्यायालयाने केला आहे.
सविस्तर वाचा -कोरोना पसरवला : चीनच्या राष्ट्रपतींसह WHO च्या संचालकाविरोधात याचिका दाखल; मोदी, ट्रम्प साक्षीदार
- श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) - बडगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये आज (गुरुवारी) तासांपूर्वी चकमक सुरू झाली. जम्मू आणि काश्मिर पोलिसांना बडगामच्या पाथनपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना शोधण्याची पोलिसांनी मोहीम हाती घेतली. पोलिसांची एक तुकडी संबंधीत ठिकाणी पोहोचल्यानंतर चकमक झाली. आता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा -जम्मू-काश्मिरच्या बडगाममध्ये पोलीस-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
- मुंबई - बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने दिले आहे. निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे आवश्यक स्थिती निर्माण झाल्यास मान्सून कधीही महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा -खुशखबर.. येत्या २४ तासात मान्सून राज्यात धडकण्याची शक्यता
- गोंदिया :संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला हरवण्यात गोंदिया जिल्ह्याला यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व ६९ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी अर्जुनी/मोरगावमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज मिळाला, आणि कोरोना हरला.