महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 19, 2020, 7:41 PM IST

Updated : Feb 19, 2020, 8:55 PM IST

ETV Bharat / bharat

वॅन इफ्राने केला 'ईटीव्ही भारत'चा गौरव, महाराष्ट्रचा झाला उल्लेख

'वर्ल्ड असोशिएशन ऑफ न्यूज पेपर अ‌ॅड न्यूज पब्लिशर'(WAN IFRA) या संस्थेद्वारे देण्यात येणारा 'डिजिटल न्यूज स्टार्टअप पुरस्कार' यावर्षी 'ईटीव्ही भारत'ला मिळाला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका बृहती चेरुकुरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ETV Bharat Maharashtra is one of the top portals in ETV Bharat says director of company
डिजीटल मीडिया व्यासपीठांमध्ये 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र' ठरले अग्रगण्य!

नवी दिल्ली - 'वर्ल्ड असोशिएशन ऑफ न्यूज पेपर अ‌ॅड न्यूज पब्लिशर'(WAN IFRA) या संस्थेद्वारे देण्यात येणारा 'डिजिटल न्यूज स्टार्टअप पुरस्कार' यावर्षी 'ईटीव्ही भारत'ला मिळाला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका बृहती चेरुकुरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी बोलताना त्यांनी 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'ने दिलेल्या बातमीचा उल्लेख केला.

डिजीटल मीडिया व्यासपीठांमध्ये 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र' ठरले अग्रगण्य!

आपल्या भाषणामध्ये त्यांनी 'ईटीव्ही भारत' काय आहे, आणि ते कसे काम करते याबाबत माहिती दिली. देशातील प्रत्येक नागरिकाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम ईटीव्ही भारत करत असल्याचे त्यांनी सांगितले. एक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असे व्यासपीठ, जिथे प्रत्येक भारतीय नागरिकाला जागा मिळेल. त्यामुळे, २१ मार्च २०१९ला आम्ही 'ईटीव्ही भारत'ची स्थापना केली, असे त्यांनी सांगितले.

यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये, 'ईटीव्ही भारत'च्या विविध विभागांपैकी, कोणते विभाग सर्वात जास्त लोकप्रिय आहेत असे त्यांना विचारले गेले. 'ईटीव्ही' नेटवर्क तेलुगु राज्यामध्ये उदयास आल्याने दाक्षिणात्य राज्यांमध्ये ते अधिक प्रसिद्ध आहे, की उत्तरेकडील राज्यांमध्ये असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की ईटीव्ही भारतच्या विभागांपैकी, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचे नाव आधी घ्यावे लागेल. तर आश्चर्यकारकरित्या, दोनही तेलुगु राज्यांचा क्रमांक हा यानंतर लागतो.

कोल्हापूरच्या 'दंगल गर्ल'चा केला उल्लेख..

'ईटीव्ही भारत'ने केलेल्या विशेष बातम्यांचा उल्लेख करत असताना, बृहती यांनी कोल्हापूरची 'दंगल गर्ल' शिवानी मेटकर हिचा आवर्जून उल्लेख केला. कोल्हापूरजवळील एका खेडेगावातून आलेल्या शिवानीने नुकतेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिचा एकूण प्रवास हा इतरांना प्रेरणा देण्यासाठी जगापुढे मांडणे आवश्यक होते, असे मत बृहती यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :'"ईटीव्ही भारत" म्हणजे असे व्यासपीठ, जिथे प्रत्येक भारतीयाला मिळते जागा..'

Last Updated : Feb 19, 2020, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details