रायपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. असे असूनही कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या देशाच्या कानाकोप सातत्याने वाढत आहे. त्यामुळे घरात बसा, साबनाणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. छत्तीसगड सरकारच्या म्हणण्यानुसार मार्केटमध्ये 1 लाख 79 हजार लिटर सॅनिटायझर्सचा पुरवठा करुन बाजारात पाठवला जात आहे. मात्र, हा पुरवठा कमी पडत असल्याचे ईटिव्ही भारतच्या निदर्शनास आले आहे.
हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'