नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकऱ्यांनी सीमेवर ठिय्या मांडला आहे. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असून आज 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी संवाद साधला. यावेळी राकेश टिकैत यांनी 32 वर्षांपूर्वीच्या आपल्या वडिलांसोबत केलेल्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला.
वडिलांसोबत 32 वर्षांपूर्वी दिल्लीला आलो होतो. ते आंदोलन दिल्लीच्या आतील भागात होते आणि आताचे आंदोलन आम्ही सीमेवर करत आहोत. तेव्हा शेतकऱ्यांच्या मागण्यापुढे सरकार झुकले होते आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांवर विश्वास ठेवला. पण आजचे सरकार त्रास देत आहे. आम्ही संघर्ष करत राहणार आहोत. बुधवारी होणाऱ्या चर्चेत आम्ही आमचे मुद्दे मांडू, असे ते म्हणाले.
सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास 26 जानेवरीला आम्ही ट्रॅक्टरसह दिल्लीत कूच करू आणि तिरंगा फडकवू. 26 जानेवारी रोजी देशभक्त आणि देशद्रोही कोण हे कळेल, असे राकेश टिकैत म्हणाले.
टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी -