महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मिरच्या बडगाममध्ये पोलीस-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

बडगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये आज (गुरुवारी) तासांपूर्वी चकमक सुरू झाली. जम्मू आणि काश्मिर पोलिसांना बडगामच्या पाथनपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

j and k
जम्मू आणि काश्मिरमध्ये पोलीस-दहशतवाद्यांमध्ये चकमक

By

Published : Jun 11, 2020, 8:45 AM IST

Updated : Jun 11, 2020, 9:09 AM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मिर) - बडगाम जिल्ह्यामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये आज (गुरुवारी) तासांपूर्वी चकमक सुरू झाली. जम्मू आणि काश्मिर पोलिसांना बडगामच्या पाथनपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना शोधण्याची पोलिसांनी मोहीम हाती घेतली. पोलिसांची एक तुकडी संबंधीत ठिकाणी पोहोचल्यानंतर चकमक झाली. आता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शोपियानमध्ये चार दिवसांत 14 अतिरेकी ठार -

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या कारवायांमध्ये बुधवारच्या चकमकीमधील पाच जणांसह एकूण चौदा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांची विशिष्ट माहिती मिळाल्यामुळे सकाळी शोपियानच्या सुगू हेंधामा भागात सैन्याकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

यावेळी लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सैन्य दलाच्या शोध पथकावर गोळीबार केल्यावर शोध पथकानेही पलटवार करत त्याला उत्तर दिले. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाचही अतिरेक्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे काश्मिर विभागाचे पोलीस अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. या यशस्वी कारवाईसाठी त्यांनी सैन्याचे विशेष अभिनंदन केले आहे

Last Updated : Jun 11, 2020, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details