नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) योजनेच्या 6 कोटींहून अधिक भागधारकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विविध क्षेत्रातील 1.7 लाख कोटींच्या प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेवेळी याची माहिती दिली होती. कर्माचाऱ्यांना 3 महिन्याचे वेतन किंवा खात्यावरील एकूण जमा रकमेच्या तिसरा भाग यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत दिली आहे.
कोरोना संकट: कर्मचाऱ्यांना काढता येणार भविष्य निर्वाह निधीतील रक्कम - केंद्रीय कामगार मंत्रालय
तीन महिन्याचे वेतन आणि महागाई भत्ता किंवा ईपीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम यातील जी रक्कम कमी असेल ती काढण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. तीन महिन्याचे वेतन आणि महागाई भत्ता किंवा ईपीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम यातील जी रक्कम कमी असेल ती काढण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ही रक्कम परत करण्याची गरज नाही. कोरोना विषाणूला महामारी घोषित करण्यात आले आहे त्यामुळे ईपीएफ योजनेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही रक्कम काढण्यास संमती देण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सदस्यांकडून आलेल्या अर्जांवर तत्काळ पावलं उचलण्यात यावेत. ज्यामुळे संकटाच्या वेळी कर्मचाऱ्यांना मदत होईल, असे निर्देश प्रादेशिक कार्यालयांना देण्यात आले आहेत.