नवी दिल्ली - रस्त्यावर आपण गाड्या धावताना पाहिल्या आहेत, पण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका रस्त्यावर चक्क विमान धावत असल्याची घटना घडलीय. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
तांत्रिक बिघाड! गाझियाबादमध्ये चक्क रस्त्यावर उतरवले विमान.. - विमानाचे आपत्कालीन लँडिंग
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका रस्त्यावर चक्क विमान धावत असल्याची घटना घडलीय. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
चक्क विमान उतरल रस्त्यावर
नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या (एनसीसी) छोट्या प्रशिक्षण विमानाची गाझियाबादमधील एका गावाजवळ असलेल्या पूर्व पेरीफेरल एक्स्प्रेस वे वर आपत्कालीन लँडिंग करावी लागली आहे. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडिंग करावं लागल्याची माहिती आहे.
विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत रस्त्यावर विमानाची लँडिंग केली. त्यामुळे स्थानिक लोकांनी वैमानिकाचे कौतूक केले आहे.