वादग्रस्त घोषणाबाजीनंतर अनुराग ठाकूर अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस
सोमवारी दिल्लीत आयोजित एका रॅलीत वादग्रस्त घोषणाबाजी केल्यानंतर भाजप खासदार आणि मंत्री अनुराग ठाकूर अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या घोषणेवरून नोटीस पाठवली आहे.
अनुराग ठाकूर
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. निवडणूक रॅली दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. सोमवारी दिल्लीत आयोजित एका रॅलीत वादग्रस्त घोषणाबाजी केल्यानंतर भाजप खासदार आणि मंत्री अनुराग ठाकूर अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.