महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

१७ व्या लोकसभेच्या निवडणुका ११ एप्रिलपासून, ७ टप्प्यांत मतदान - press

२०१९च्या लोकसभा निवडणुका एकूण ७ टप्प्यांत होणार आहेत. ११ एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होईल. २३ मेला निकाल जाहीर होईल. आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त

By

Published : Mar 10, 2019, 6:32 PM IST

Updated : Mar 10, 2019, 6:49 PM IST

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची प्रतीक्षा आज संपली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुका एकूण ७ टप्प्यांत होणार आहेत. ११ एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होईल. २३ मेला निकाल जाहीर होईल. आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील मतदान

पहिला टप्पा - ७ मतदारसंघ

दुसरा टप्पा - १० मतदारसंघ

तिसरा टप्पा - १४ मतदारसंघ

चौथा टप्पा - १७ मतदारसंघ

मतदानाचे ७ टप्पे

पहिला टप्पा - ११ एप्रिलला मतदान, ९१ मतदारसंघ, २० राज्ये

दुसरा टप्पा - १८ एप्रिलला मतदान, ९७ मतदारसंघ, १३ राज्ये

तिसरा टप्पा - २३ एप्रिलला मतदान, ११५ मतदारसंघ, १४ राज्ये

चौथा टप्पा - २९ एप्रिलला मतदान, ७१ मतदारसंघ, ९ राज्ये

पाचवा टप्पा - ६ मेला मतदान, ५१ मतदारसंघ, ७ राज्ये

सहावा टप्पा - १२ मेला मतदान, ५९ मतदारसंघ, ७ राज्ये

सातवा टप्पा - १९ मेला मतदान, ५९ मतदारसंघ, ८ राज्ये

मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा म्हणाले -

  • गृहमंत्रालयाशी अनेकदा चर्चा झाली.
  • निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.
  • सर्व राजकीय पक्षांची चर्चा करण्यात आली.
  • जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी १२ तास चर्चा
  • परीक्षा आणि सणांचाही विचार केला आहे.
  • यादीत नावाचा समावेश असल्याबद्दलच्या माहितीसाठी १५९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
  • अंध मतदारांसाठी मतदार यादी ब्रेल लिपीमध्ये
  • व्हीव्हीपॅट मशीन्स ईव्हीएम मशीन्ससोबत वापरली जाणार आहेत.
  • यंदा देशभरात १० लाख मतदार केंद्रे
  • २०१४ च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली.
  • आजपासून देशभरात आचारसंहिता लागू
  • यंदा ईव्हीएममध्ये उमेदवारांचे फोटो असणार
  • संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटींग होईल
  • आचासंहितेचा भंग झालेले कळविण्यासाठी विशेष अॅपची व्यवस्था
  • तक्रार केल्यापासून १०० मिनिटांत कारवाई होणार
  • दिव्यांग मतदारांसाठीही विशेष अॅपची सोय
  • दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय
  • मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद होणार
  • देशातील मतदारांची संख्या ९० कोटींहून अधिक असेल.
  • प्रचाराच्या जाहिरातींवर निवडणूक आयोगाचे लक्ष
  • फेसबुक, ट्विटर, गुगलवरील जाहिरातींवर लक्ष
  • पेड न्यूज रोखण्यासाठी विशेष प्रयत्न
Last Updated : Mar 10, 2019, 6:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details