महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंड विधानसभा: निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

By

Published : Nov 3, 2019, 2:37 PM IST

निवडणूक आयोग

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी महसूल विभागातील माजी अधिकारी बी. मुरली कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बी. मुरली हे १९८३ च्या तुकडीतील माजी महसूल अधिकारी आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये 81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर 23 डिसेंबरला मतमोजणी होईल. झारखंडच्या विधानसभेचा कार्यकाळ २७ डिसेंबरला संपणार आहे. झारखंडमध्ये एकूण ८१ विधानसभेच्या जागा आहेत. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे.

निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना पैसे, दारु आणि विविध वस्तूंचे अमिष दाखवण्यात येते. पैसे देवून मते विकत घेण्याचे प्रकार घडतात. आता विशेष अधिकाऱ्याद्वारे निवडणूक आयोगाची या गोरखधंद्यांवर करडी नजर राहणार आहे. निवडणूक काळात पैशांची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढते.

ABOUT THE AUTHOR

...view details